खडकीतल्या ओल्ड ग्रॅन्ट बंगल्यांविषयीची बातमी वाचली आणि मन जवळपास तीस - पस्तीस वर्षं मागं गेलं.
अर्थात, एकूण पुण्यातच गर्दी फार नसे आणि खडकीला तर पुण्याचे आऊटस्कर्ट्स मानलं जाई, मी शिवाजीनगर ला असलेल्या माझ्या शाळेत कितीही उशिरा गेलो तरी, खडकी वरून आलोय इतकं सांगून शिक्षा टळत असे .