२. जॉली - १

Thirty second story …going down …टिंग… संध्याकाळचे ६:३० आणि DBS TOWER मधल्या ४५ व्या मजल्यावरील office मधून खाली निघालो की लिफ़्ट ची अगदी passenger train होते. प्रत्येक मजल्यावर अगदी थांबत थांबत मग १८ वा मजला आणि मग लिफ़्ट बदलून ..पुढचा प्रवास …

त्यातल्या त्यात सिंगापुर लेडीज डॉमीनेटेड आहे म्हणून बरे ..२५ – ३० वयाच्या (आणि काही तशा दिसण्याची desperately कोशिश करणा-या ) कमीत कमी दहा पोरी तरी (सगळ्या चिनी पोरी लुकड्या असतात usually त्यामूळे …माझ्यासारखे एक दोन जाडू लोक आणि १० ते १२ बायका आरामात एका लिफ़्ट मध्ये येतात). आणि मग त्यांचे ते नटणे …आधीच नटलेल्यांनी नाजूक बोटांनी अजूनच नाजूक मोबाईलवर ट्च ट्च ..करत एसेमेस टाईप करणे ..हे सगळं होत होत छान वेळ जातॊ.

शॆवटी मग ..फ़र्स्ट फ़्लोर ..वर ..एक अथक थकलेला जिव ..मी आणि ब-याच बाहूल्या बाहेर पडतात …पॉंड्स..की फ़ा ..की आणि कशाचा तो फ़्रेश वास …१० – २० स्क्वेअर फ़ुटांचे आसमंत भरुन टाकतो… मग एम आर टी (ट्रेन) स्टेशन मधला तो सँडलचा टॉक टॉक आवाज अगदी लयबदध, काही म्हणा पोरींच्या बाबतीत हा देश नंदनवन आहे. बघा मूलींबद्दल बोलत बसलं की अस्सा ट्रॅक सुटतो. कालच चेतन भगत चे नवे पुस्तक संपवले एका ठिकाणी तो म्हणतो ’ why cant we stop noticing beauty?' खरचं आहे ते.

अशाच एका शुक्रवारची गोष्ट, 16th floor वर आणखी एक चिनी पोरगी लिफ़्ट मध्ये आली ….दाटीवाटीने सगळ्या बायका एकत्र एडजस्ट करत्या झाल्या ! ही यायच्या आधी १४ म्हंजे आता एकूण १५ ..वाह आज रेकॉर्ड होतेय…की काय ..याआधिचे १२ पोरींचे होते. अशा ब-याच गोष्टी आपण मोजतॊ, नोट करतो नाही?

म्हंजे टपरी पासून ते माझे घर ..३८० पावले …शाळेच्या बस स्टॉप पासून ते कच्छी दाबेलीची गाडी १०४ …(यावर मी १० एक वेळा दाबेलीचीच बेट जिंकली आहे), आज्जीच्या घराबाजूचा भय्या सकाळी बरोबर साडॆ चार कप चहा बोहणी म्हणुन बाहेर फ़ेकतो, जोशी वडेवाले बरोबर ९ वेळा तेलात वडा वर खाली करतात …एनीवेज … तर ही १५ वी, माझी रेकॉर्ड ब्रेकींग हिरोइन…मझ्या नजरेतले कौतूक कळले वाटते तिला.. छानसे स्माईल दिले …डॊळे अजुन छोटे झाले ..मीही हसलो…

कधी कधी नाती अगदी आख्या दिवसासाठी बांधलेली असतात …सकाळी भेटलेली व्यक्ती मग ..दिवसभरातून १० वेळा तरी भेटते, मग आपण ’ काय तूम्ही तर काय आज पाठलागावरच आहात’ अस्से काही म्हणतो. आज बहुतेक मी हिच्या पाठलागावर होतो. कारण ट्रेन मध्ये परत हि बाजूला बसायला, मूहुर्तावरच बाहेर पडलो होतो जणू. लिफ़्ट मध्ये असल्यापासून बघत होतो हि बया हाताचा तळवा पुन्हा पुन्हा पुसत होती. ट्रेन मध्ये पण चुळबूळ चालूच, एकदा दोनदा मला हात लागल्यावर ’ सॉरी ऑं?’ चिनी लोकांचे हे आहे, सॉरी म्हणतात आणि confirmation मागतात.

‘its ok’ मी. ’its that damn ink you see,' हातावरच्या ठिपक्याकडे लक्ष वेधून ती म्हणाली.

जोरजोरात पुसून लाल झालेल्या तळव्यावर अंगठयाच्या खाली एक ब-यापैकी मोठा काळा ठिपका होता. ‘its the card printing ink .. it wont go for days ..’ आता अगदीच रडवेलीशी होत ती म्हणाली. तिची धडपड चालुच होती.. एक दोन स्टेशन्स गेल्यावर मग मीच विचारले,

‘So you work in DBS too?’
‘ya card tagging printing 16th floor. u?’
‘45 th floor ATM project’
‘ok’

परत नवीन टिश्यू …परत हात चोळणे ..

‘you said it wont go for some days ..so why are u trying so hard? ..let it be, So you got a Jolly whats big deal?’

‘I am trying to lighten it up .. have a date tonight ..jolly ? whats that ..?’

जॉली !!!!
किती दिवसांनी म्हणतोय हा शब्द.
काही शब्द, काही वास, काही गाणी कुठल्या कुठे घेऊन जातात. मोठयाने म्हणा बरं…. चिनी मनी बोरं किंवा म्हणा सहामाही परीक्षा….. किंवा ७ च्या बातम्या ..त्यानंतरचे हॅलो ईन्सपेक्टर किंवा डबल डेकर बस, शाळेतले रंगीत खडू, घंटा
कित्ती गोष्टी आठवतात नाही?
जॉलीला आम्ही जॉली म्हणायचो तूम्ही काय म्हणायचा हो?
३री की ४थी पासून पेनने लिहीने allowed झाल्यापासून पोरे हातावर काळा वा निळा ठिपका रंगवून यायची,

आणि मग ज्या ज्यांशी जॉली लावली आहे त्यांचे हात चेक करायची जॉली नसेल तर मग ५ पॉईंट्स, काहीही १.२५
रु चा वडा पाव .. खारे दाणे अगदी काहीही…
सकाळी सकाळी शाळेत,
“जॉली ! , तू दाखव ना …ए आत्ता काढु नकोस …साल्या चिडू नकॊस"
“गप्पे तो ठिपका नाहीये, काही "
“च्यायला ही तर कालचीच जॉली आहे आंघोळ नाही का रे केलीस? “
हे सगळे ऎकू यायचे

बॉल पेन ने काढलेली जॉली आख्खा दिवस टिकायची
त्यामुळे शाळा सुटतानाच्या जॉली सेशन साठी ठिपका रंगवायचे लक्षात ठेवायची गरज नसे.
बॉल पेनचा तो ठिपका घासून धुतला नाही तर दुस-या दिवशी हि पुसट पुसट असायचा. कधी कधी मग त्याचा बेनिफिट ऑफ डाउट मिळून जायचा.

पण हे सुख फ़ार कमी जणांना मिळायचे, कारण घरुन शाई पेनने लिहिण्याची सक्ती (अक्षर छान होते म्हणे ..) आमच्या घरी तर शाई पेनचे इतके फॅड होते कि विचारू नका, एकदा मला धडा दहा वेळा लिहून आणायची शिक्षा झाली होती …आता त्यात अक्षर चांगले काढायची काय गरज? पण मला बॉल पेनने लिहिताना बघून आई इतक्या जोरात " निख्खिल !!!!!!” अस्से ओरडली होती कि, …मी एखाद्या अफ़्रिकन पोरीशी लग्न करून तिला आईच्या पाया पडायला घेऊन आलो होतो जणू.

यावर कडी म्हणजे speed कमी होतो तर “मी बोर्डाचे पेपर बॉल पेनने लिहू का?” यावर तर आईची प्रतिक्रिया मी एखाद्या अफ़्रिकन पोरीशी लग्न करून मग मला एखादे पोरगे झाले आहे आणि त्याचे नाव मी काही उझबेक की दोदी-अल ठेवले आहे …अशी होती.

ते असूदेत …

या जॉलीचे १० पॉईंट्स साठवून मग बॅलन्स करायला म्हणून धपाटा मारणे, नव्या सायकलच्या १० राउंड्स घेणे, home work करून घेणे हे सर्व चालयचे.

यातले जितके तिला रिलेव्हंट वाटेल ते तिला सांगितले. एव्हाना तिचे हात पुसनेही कमी झाले होते.

मला अशी सुपरफिशियल गोष्टींसाठी त्रास करून घेणारी माणसे बिलकुल आवडत नाहीत. त्यांना हलवून मग विचारावेसे वाटते “ठिक आहे रे बाबा, इतके काय बिघडले? रडू नकोस लेका. एक दोन सामोसे खा दोन एक कप चहा हान, अन बालगंधर्व पूलावर बसून पोरी बघ की, टेंशन काय आहे भावा?”

‘So India?’
’हं या’
‘I heard its good’
‘very’
‘u here for?’
‘for some work’
‘ohh ok ..I see u everyday either morning or evening in lift or in bridges (food court 3rd floor)…. u look like that terrorist with ur beard ..’
च्यायला ..(हे मनात)
‘no but i am not …any terr..’
‘ya of course, i know now’
तिचे ते हाताकडे परत परत बघणे सुरु झाले होते….
‘Look, I tell you what .. '
‘Joyce’
‘I’m Nikhil, Ya Joyce ..tell u what .. until ..u have that spot ..I will too sport one…on my hand .. lets play
Jolly ..den u wont feel that bad ? can?’
‘Sure I dont have much choice but u ? nikkeel is it..?’
मी बॉल पेन काढले, (फ़र्स्ट टाईम बॉल पेन जॉली वा …. brilliant ..)
आणि माझ्या हातावर एक ठिपका रंगवला.
‘ya, thats correct, nikhil, Jolly joyce.. show me urs ..’
ती हसली.
‘ok ok my station…’ मी म्हणालो आणि निघालो.
‘See u on monday .. ' ती म्हणाली ‘be ready to treat me, my jolly is permanant ..for next some days .. u might forget ..’
‘sure, will see bout that .. joyce, all the best for ur date bye’
‘chaao’

(क्रमश:)

-निखिल.

comments powered by Disqus

Related