३. जॉली - २

आतापर्यंत …
जॉली - १

युष्यात गरज असताना पेन न मिळणे हजार वेळा तरी झाले असेल, ही एक हजार एकव‌ी वेळ.

लंच टाईम, ब्रिजेस मध्ये मी Joyce ला आधीच स्पॉट केले होते. तिच्या माझ्यामध्ये दहा लोक तरी होते. तिने बहूतेक मला नव्ह्ते पाहीले. पोरं पोरींना आधी शोधतात, कारण दिवसातला बहूतेक काळ त्यांच्या डोक्यात “पोरगी पोरगी पोरगी पोरगी पोरगी पोरगी ……..” असे लूप मध्ये चालु असते….

पेन शोध आत्ता मूर्खा !!!!

लाईन मध्ये पुढे एक पोरगी …तिला पेन मागितले तर तिने तिच्या पर्स मध्ये हात घातला ..आणि घुसळायला लागली…झाले …४ ५ कंगवे …२ एक पिना …इथे काय पेन नाही मिळत …बा…. मागे एक ऑस्ट्रेलियन जाड्या

‘Can I have your pen please’
‘Surremate .. ' (बरोब्बर ऑस्ट्रेलियनच!!)
जॉली बनवली, आता नो फ़िकर …
‘here man .. ur pen, thanks..’
‘surre ..hey but whats that for ..’
‘just some reminder ..’
‘strange mate ..’
‘hmm it is’ मी हसत म्हणालो.

चायनीज लोक काहीही खातात …अक्षरश: काहीही
कुठल्यातरी सूप मध्ये तीन चार अर्धे बटाटे उकडलेले ….आणि नूडल्स्‌ आणि चिकन पिसेस्‌ ..लगदा नुसता.
घेउन हि समोर उभी …

‘show show ..’
‘here …’ मी हात दाखवत म्हणालो ….
‘waau .. thats fresh, now is it not?’
‘did u ..?’
‘yes i did…. see u .. borrowing from steve ..he is my boss …so always one eye on him ..’

कित्ती छान हसते ही …

‘ohh busted then … so when do i treat u? huh ?’
‘ummm lemme see, lemme see, hmmmm …. …i already paid for this .. so ..evening ..? subway ?’
‘sure’
' ..83452188 .. '
‘what?’
‘my number silly .. you planning to meet me in elevetor again? or what? dont escape this, my first jolly treat ..first good thing happeneing cuz of this spot..’

ठिपका बराच गडद आहे… कित्ती वेळा हिला चारावे लागणार आहे ?
त्यात हे लोक जेवले की हात धूत नाहीत …हिची जॉली बरेच दिवस टिकणार आहे बहूतेक.

ठिकाय……

7 PM माझा एसेमेस …

hi, Nikhil here .. ready for ur treat?

7.01 PM
Hey Nikkil ..Starving ..which floor u?

7.03 PM
ground in front of tower ..

7.04 PM
Already? …gimme ..2 mins .. be there ..ok bye …

7.25 PM ….हे हिचे 2 mins …
‘Hi hello hello ..nikkeel….hi… '

मुलींचा मला सहसा कधीच राग येत नाही… आणि आला तरी ..इतक्या प्रेमळ हाय हॅलो समोर तो टिकतोय थोडाच?

‘So ur two minutes .. hmm ?’

माझ्या त्या तिरकया प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करुन आणि नजरेत ..’मूलींना इतकाच वेळ लागतो माहित नाही का? रे?’ असा भाव.
‘This way …its faster ..come come..’ पाय-यांवरुन खाली जात ती म्हणाली.

सिंगापुरची संध्याकाळ छान असते …आख्ख्या दिवसात दमटपणामुळे शिणलेले अंग गारश्या झुळुकेने खुश होउन जाते.

सब वे सॅंडविच…
बाप रे कित्ती खाते हि ….बारीक तर आहे वाटत नाही इतकी Capacity असेल म्हणून.
६ इंच सॅंडविच त्यात १० वेगवेगळ्या भाज्या, मस्टर्ड, मीट लोफ़ …
अजून काय काय ऑलिव्ह वगैरे … सगळं पाहिजे …

‘u sir ..?’
‘just one simply salad sandwitch ..and orange juice..thank you’

‘16 Dollars 40 cents..’
‘here’
‘Thank you sir, here ur sixty cents..’

‘So how was date the other day …?’ मी बसूपर्यंत हिने, जाते सुरू केले होते चरक चरक चरक….चरत होती ..जशी.
‘vely gool .. ' सॅंडविचने भरलेले तोंड … मस्टर्ड चा ओघळ टिपताना तिची गडबड …’no one noticed la!’ (आपण जसे ok रे, नो रे असं हिंमराठी बोलतो ना..तसं हे लोक ओके ला, शुअर ला …नो ला असं म्हणतात)

‘of course no one would notice, that small thing, ….u r quite beautiful’ …हेच हेच मी मिस करतो आपल्याकडे …आता एखाद्या सुंदरश्या कोब्री (को. ब्रा. पोरीला) ’छान दिसतेस’ अस्से सपक वाक्य ही राग आणेल की नाही. आपल्याकडे उस्फूर्त स्तुतीतही लोक हेतू का बरं शोधतात? इथे ती भिती नाही, यु कॅन स्पिक युअर माइंड.

‘thanks.. ऑं?’ (परत तेच, confirmation ..)
‘its ok…u do look nice i mean it’ मी तिच्याकडे बघत म्हणालो.
‘So whats ur story ?’
‘Story ? there is no story .. '
‘I mean what u do ? in india ..all that’

मग मी कसा पुण्याचा आहे, आणि माझे सगळं कसं पुण्यातच्‌ आहे ते सांगितले….

‘punnet .. where is punnet ?’
‘its near mumbai bombay u know ?’
‘mmm bombay ..yah la ..know that one..already..’
‘bout u?’
‘Malaysia, KL, working here for sometime .. den go back ..’
‘Ur boy friend?’
‘in Malaysia ..’
‘Here?’
‘Also have .. one..but no serious la ..’

हिचे सॅंडविच संपून एव्हाना हिने माझा orange juice पिणे सुरु केले होते.

सिंगापुर पुर्वी मलेशिया चा भाग होते, पण एक ४०,४३ वर्षांपूर्वी मलेशिया वाल्यांनी त्यांना वेगळे
फेकले, पण या लोकांनी अस्सा काही देश बनवला की, आज मलेशियंस एकडे काम करायला मरतात. हे एक बेट आहे, स्वत:चे पाणीही नसलेला हा देश, पाणी मलेशियाकडून भाज्या वगैरे भारत चीनकडून… अस्से चालले आहे यांचे. इन मिन 700 Sq KM क्षेत्रफळ (पुणे 704 sq KM एफ वाय आय).

’You want some juice ?’ बॉटल सरकवत ती म्हणाली ’I can not have it now, I am veggie and u just ate meat !!’
’ohhh, sorry sorry, you want another one?’ अपराधी स्वरात ती म्हणाली
‘no, its ok’

‘So what about you? Nikkiel? your Girl Friend stays with you or back in india?’
concepts फ़ारचं कच्चे आहेत हिचे …बाई भारतात असले काही नसते गं …पण अस्से सांगून उगीच सगळ्या भारतातल्या पोरांची का लाज का काढा?
‘no girlfriend..’ मी वार झेलला …आह ..खच्याक….
‘how? no beautiful girls in punnet?’
‘no there are ..in PUNE ..but they are not accessible ..’ PUNE शब्दावर स्ट्रेस देउन …मी ‘what u mean ?’
मग मी तिचे पुण्यातल्या मूली यावर एक दहा मिनिटे …आणि मग …arranged maraiage …shaadi.com etc…वर एक दहा मिनिटे ….बौद्धीक….घेतले. त्यात शंभर वेळा तिचे “are you kidding?” “what are u saying!!” झाले.

8:30 PM

‘Which station u want to walk to ..?’
‘Raffels place?’
‘Ok..’

ट्रेन मध्ये ही गर्दी ….
ती कुठेतरी लांब उभी …i-pod अशावेळी बेश्ट कामी येतो.

(क्रमश:)

-निखिल.

comments powered by Disqus

Related