७. उगाच रात्रीचा …दिवस ..वगैरे, करून…
ख
च्च बावळटपणा खरं तर. म्हणजे वाईट झोप आलीये पण उग्गीच स्क्रीन समोर, रोजचंच झालंय च्यायला. मध्ये तरूण ला विचारले की २० एम एल ब्रॅंडी चढेल का ? तर म्हणाला की “चढेल, if you act!” म्हणुन आज १००+ एम. एल. घेतोय बाकी घसा दुखत होता म्हणून सुरु केलेली, ग्लासात पाण्यापेक्षा ब्रॅंडी जास्त अस्सेपर्यंत पोचलोय. मला खरच चढत नसावी, किंवा ऍज दे से … आय ऍम अ टॅंक… टॅंक.
लिहायला बसलोय खरं पण काही डोक्यात नाहीये, लेखाचे नाव काय द्यावे त्यापासून ..काय लिहू ..कशाबद्दल कोणाबद्दल लिहू.. चिडचिड…नुसती.. पण….. खाज, काहीतरी खरडून(च) झोपणार आहे…ह्म्म्म्म्म्म…..कामाबद्द्ल लिहावे तर खूप दिवसांत कॉंक्रीट अस्से काही केले नाहीये.
नुसता बसून येतो ऑफिस मधून. म्हंजे काम अगदीच नाहीसं नाही, देवाने डोकं अस्सं भन्नाट दिलंय की, लवकरं आटपतो. लोकांना उगीच ..”कित्ती डिप ऍप्रोच देतोय..” कसलं काय..हाईप ..कधी मधी आवडते आपल्याला पण म्हणा ..लोकांबद्दल लिहावे तर, नको, संदर्भ द्यावे लागतील..नाही दिले तर ..काही जणांना वाचून लागतील…नकोच ते.
आई घरात नसताना कसं कुठे चुरमूरे ..खा कुठे टोमॅटो मीठ लावून खा कि अगदीच ..कच्चे दाणे चावत बस..तस्सं चाल्लंय आज माझं हावरटपणा खरं तरं मला झोपावसं वाटत नाही इतकं सोडून लिहायला काहीही कारण नाहीये .. शिवाय नेट आहे, दारू आहे आणि विनॅंप कानात गाणी ओततोय..
मेथॉडिकल वे ट्राय करूयात ..म्हणजे ते कसं दोघं भेटले की, आज हवामान भारी आहे..झाडं कित्ती हिरवी, तस्सं काही आईस ब्रेकींग जमतयं का सुरूवात करायला…
आज पाऊस पडला ..
नाही आईस ब्रेकींग नाही खरंच ! खरंच आज पाऊस पडला..
मला पाऊस आवडतो..
आपल्या बुटात पाणी भरले तरी .. छत्री नसलेल्या पोरींची पळापळ बघायला भारी वाटते..
मला पोरीही फार आवडतात…
अब्बे …
निबंध व्हायचा ना..अशाने ..
..मेथॉडीकल म्हणे
दारू पिऊन
कस्सं होणारं … भें..डी
हे नको..
बरं …मग?
वैताग ..
पिच्च्र्र बघुयात का ?
नको ..
फोन? कोनाला ? झोपली असेल ..शिवाय..आता काय..उरलयं.
च्यायला ..
काहीच कसं लिहित नाहिये मी..
कॉपिरायटर असतो तर वाईट लागली असती.
रेटुयात पावसावरंच,
पण खरंच पाऊस लयं वेड पडला..
इतका की मशीन वाली कॉफीपण ग्रॅंड वाटली.
पावसावर किती जणांनी काय काय लिहिलयं,
त्यामुळे आपण नको हात घालायला..
आय पॉड मध्ये “सरीवर सर” असायला हवे होते, बस मध्ये बसल्या बसल्या वाटून गेले.
आता टाकतो ..पुढच्या पावसांसाठी.
बाकी.
सिमेंटच्या रस्त्यांचे .. एक मला आवडत नाही, पाऊस पडल्यावर ते नवे होत नाहीत.
मला लोकांचेही एक कळत नाही पॅंट ओली असेल पावसाळ्यात तर तेव्हडा “बेनिफिट ऑफ डाऊट” का देत नाहित? फुकट हसणे.
पण, बस आणी पाऊस हे कॉंबीनेशन जबरा.
तिसरीत ..कि चौथीत ..धो धो पावसात कुठ्ल्याश्या शनिवारी मी चुकिच्याच बसने कुठे तरी भरकटून फिरून शेवटी घरी पोचलो तर.. आईची पुजा झाली होती, डोकं पुसून मग आईने ..रव्याचा लाडू दिला होता. भन्नाट.
खेरीज पावसात मी गांडुळं पाळायचो.
बास पावसावर .. लिहिणार नव्हतो ना ? बास ..
सरीवर सर टाकलंय.. आय पॉड वर .. आता पाऊस पुराण बास.
घरी यायला दिड तास लागला.
काय ते मर्फिज लॉ ते ..आहेत ना त्यात आपली एक ऍडिशन..
आपल्याला लागली अस्सेल, कि ट्रॅफिक जाम होतो.
किंवा याचीच एक करोलरी ..म्हणा ..
ऑफिस मधून करून निघाला नसाल कि हमखास रस्त्याच्या कडेला “शंका”निरसन करणारं पब्लिक तुम्हाला पाठमोरं वाकूल्या दाखवतं
बस मधलं सकाळी सुवासिक असलेलं पब्लिक, ब-यापैकी आंबलेलं असतं. मग कोणी झोपतात. कुणाच्या लग्नापूर्वीच्या गप्पा फोनवर.मी आपला गाणी ऐकत त्या सगळ्या गोतावळ्याला ओबसर्व करत बसतो. भन्नाट आहे
पब्लिक, एकेकाच्या त-हा. आजकाल रिसेशन वर गप्पा मारनारे त्यात अधिक, बरीच माहिती मिळते. मात्र अशा
गप्पा मारल्यामूळेच ..जगात काही काम न होता रिसेशन आले असेल असा आपला माझा एक अंदाज.
परवा गंमत झाली, वर ठेवलेली बॅग एकाच्या डोक्यात पडली,
तर काय रीऍक्षन अस्सेल?
सगळ्यांनी आपापल्या डोक्यावर बघून घेतले.
बरं ठिकायं, तरं यायला दिड तास लागला.
कोण गर्दी..
आता पूर्वीचे पुणे यावर लिहायला ऍंगल निर्माण झाला,
वा
मेथॉडीकल वर्क्स!
पण नको.
एव्हडंच..की
गाड्या वाढल्या की रस्ते हि वाढवतात.
रस्ते वाढले म्हणून मग गाड्या आणिक वाढतात..
अपेक्षांचं..आपल्या पळण्याचं हि असंच आहे का ?
दमणूक थांबवायला हवी
पाऊस, ट्रॅफिक, बस आणि काय?
आरे हो सकाळी बस साठी पळताना,
“हॅलो”
“हा, आओ ..सर्पंच हायंत का?”
“काय ?”
“सरपंचांना द्या ना राव”
“रॉंग नंबर..”
“आरं तिच्यायला …”
माझी ऑफिसची बस चुकण्याची अनेक कारणे आहेत ..
हायवेवर दुरवर बस दिसली की स्टॉपकडे वेड्यासारखं पळताना आलेले अस्से फूक्कट फोन, इमर्जंसी मधला ऑपरेटर असल्यासारखा ते उचलणारा मी, कधी कॉलनीच्या कूत्र्याला हात लावताना झालेला टाईमपास, गेट मध्ये ठाण मांडून बसलेली गाय या सगळ्यातून ….अगदी फोटो फिनिश मध्ये का होईना मी ब-याचदा बस पकडतो. ड्रायव्हर आणि ओळखिच्या पब्लिकच्या डोळ्यात माझ्याविषयी चे कौतूक लपत नाही. यातले बरेचसे मी बस पकडेन की नाही यावर बेट लावत असावेत अशी मला दाट शंका आहे.
आरे आज काय माणसांविषयी लिहिणारचं नाही का?
बस काय, पाऊस काय …
बरं चला माणसांविषयी थोडं,
नको.. म्हणजे ..राग नाही पण,शिवाय फार छान लोक आहेत .. आजुबाजुला…
शिवाय कुणी काय ..अस्सं सबस्टॅंशियल छळलंही नाहिये ..
खेरीज सगळ्यांविषयी ..कुठं आपण लिहितो..किंवा विचार तरी..
Usually, एका वेळेस, किंवा, at any given point in time, आपण एकाचाच ..विचार करू शकतो, करतो.
बघा आठवून..
एनी वेज…
परत मेथॉडीकल,
जाउदेत …नकोच.
नाव राहलयं द्यायचं,
दिलं.
पण झोपता झोपता… आणिक थोडं …
माणसांविषयी…
नोप्स..
एका माणसाविषयी ..
एका वेळेस ..एकच,
TO YOU.
तू
हसरे मोठे डोळे ..
लगबग ..
केस बांधणे..
पर्सची कोंबाकॊंब..
मी …
समोर..उभा..
आजूबाजूला काय?
आठवत नाही ….
मी…
सांगणार आहे तूला काही
तू….
डोळ्यात पाणी ..
तूला हसवायला मग..
जोक्स..
गोष्टी
जिवाचा आटापिटा…
शेवटी….
हसलीस ..
हुश्श ..
छान..
गोड
चाबूक ..दिसतेस …
मी…
ही
खुश..
काय सांगणार होतो..
आठवतेय.
पण.
बघू..
नंतर कधी
मग,
नंतर कधीतरी ..
की
शेवटी?
तू….
ऑकवर्ड..
अनोळखी…बघणे..
ठरवून..
मी…
काय सांगणार होतो..तेव्हा.
आठवतेय?
हो.
पण
आता
हाऊ डज़ इट मॅटर?
बाय.
-निखिल.