१६. राम गाण्यांतला आणि राम आपल्या आतला
ज
गमे सबसे उत्तम है | मर्यादा पुरुषोत्तम है ||
सबसे शक्तिशाली है | फिर भी रखते संयम है ||
पर उनके संयम की अब आने को है सीमा |
रावण, समय है मांग ले क्षमा ||
माझ्यामते भारतीय मनांतल्या रामाचं हे सर्वात सुंदर वर्णन असावं.
रामाकडून काय शिकावं ?
आधी उत्तमांत उत्तम व्हावं, आणि तरीही नम्र राहावं
अमर्यादित शक्तीला संयमाचं कोंदण असावं
दुष्प्रवृत्तींनाही एक तरी संधी द्यावी आणि मग मात्र पूर्ण शक्तीनिशी नायनाट करावा
राम हा सकल भारतीय मनाचं प्रतिबिंब आहे.
भारतीय सहिष्णू वृत्तीच मूळ आणि
भारताच्या आणि भारतीयांच्या कमीत कमी साधनांमध्ये
आहे त्या लोकांना एकत्र आणून
आणि आहे त्या गोष्टी वापरून
मोठ्यात मोठ्या समस्येचं निराकरण करण्याच्या वृत्तीचा उगम म्हणजे राम !
एक एकतारी हाती
भक्त गाई गीत ।
एक एक धागा जोडी
जानकीचा नाथ ।।
राजा घनश्याम
कौसल्येचा राम ।
भक्ताकडून स्वतःची स्तुती ऐकून घेतानाही भक्ताचेच शेले विणणारा राम
गदिमा पुढे लिहितात
दास रामनामी रंगे
राम होई दास !
प्रसंगी भक्ताचा दास होण्याइतका सूक्ष्म राम
आणि
गिन पायेगा उनके गुण कोई क्या, इतने शब्द ही कहा हैं |
पहुंचेगा उस शिखर पे कौन भला, मेरे रामजी जहां है ||
इतका विशाल राम
रामाकडे देव म्हणून पाहायची गरज किंवा सक्ती तर नाहीच
उलट एखाद्या गोष्टीत काही आता “राम” राहिला नाही असा आपल्याकडे वाक्प्रचार आहे
प्रत्येक गोष्टीतला चांगला गाभा म्हणजे त्या गोष्टीतला राम
मग आपल्या सगळ्यांमध्येही आहेच की “राम”
त्यावर काळाची
जगाने दिलेल्या धक्क्यांची
आपल्या स्वतःच्या रोज होणाऱ्या चुकांची
पुटं चढली असतील
धुवून काढायला हवीत
कारण
शेवटी
मन से रावण जो निकालें
राम उस के मन में है |
शोधा आपल्यातला - राम
येउदे त्याला बाहेर
रामनवमीच्या शुभेच्छा !
-निखिल
गीते -
पल पल हैं भारी (स्वदेस - २००४) - जावेद अख्तर.
कौसल्येचा राम (देव पावला - १९५०) - ग दि माडगूळकर.
चित्र क्रेडिट - PicsStory, https://www.pinterest.com/