१३. शब्दांचं आयुष्य
व्या
यामचड्डीचा खिसा छोटा आहे, त्यामुळे जीवनसाथी (मोबाईल) बरोबर नेता येत नाही, किल्लीचा जुडगा तेव्हडा मावतो.
तर,
तसा निघालो, एक गोरे आजोबा व्यायामावरून येत होते, आज (अनेक दिवसांनी का होईना) मीपण पळायलाच चाललो असल्यानं नेहमीसारखं गिल्टी वाटलं नाही. वर त्यांनी अगदी ओळख असल्यासारखा हाय वगैरे केला. खरंय पण, एकुणातच सगळे प्राणी दुसरा समोर आला कि ऍकनोलेज करतात, म्हणजे कुत्री समोर आली कि गुरगुरतात, मांजरं पण, अगदी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या मुंग्या पण काहीतरी देवाणघेवाण करताना दिसतात, चिमण्यांचंही तेच, मग माणसांनी हाय म्हणायलाच हवं. हाय आजोबा, व्हाट्स अप !
मी राहतो त्या एरियात तळी फार, बदकं आणि इतर पक्षीपण बक्कळ. आपण पळत जवळून गेलो कि ती सगळी बदकावळ लगबगीनं पाण्यात उतरते. आपण लांब गेलो कि परत बाहेर. आज मुद्दाम एकाच्या थोडं लांबून आणि त्याच्याकडे विशेष लक्ष न देता गेलो (मराठीत - ईग्नोर मारून) तर तसंच पाण्याबाहेर बसून राहिलं, आणि येताना मग अगदी जवळून आलो तरी हललं नाही, इतक्यात विश्वास बसला पण ! कमाल आहे. काही लोक्स पोरी अशाच पटवतात म्हणे ! असेल असेल.
परत येताना टेनिस कोर्टावर थांबलो तर आपलं(?) गुलटी पब्लिक, मी पण जॉईन होतो कि काय म्हणून हाय म्हणायला पण तयार नाही ! तसाच पुढे आलो शेजारच्या लेक वर इंडियन आजी आजोबा नातवांत मग्न, यातल्या आजोबांनीपण अगदी हात हलवून हाय केला. जुनी ती शहाणी म्हणावीत का (काहीही हं श्री !). बाय द वे देवानंद स्टाईल टोपीची क्रेझ या पिढीत अजूनही आहे.
तिथून येतो तर, एक सॅंड क्रेन ची जोडी बिल्डींग शेजारी वाटच बघत होती, जवळपास चार एक फुटांचे शहमृगापेक्षा थोडे छोटे हे पक्षी बर्याचदा ट्राफिक पण अडवून धरतात, अगदी आरामात रस्ता क्रॉस करतात.
जनरली मग मी यांचे फोटो काढतोच पण आज तर मोबाइल जवळ नाही, तर शांतपणे अगदी त्यांच्या जवळ जाउन उभा राहिलो, माझाही शर्ट त्यांच्या रंगाशी मिळताजुळता राखाडी असल्यामुळे असेल कदाचित पण अगदी जवळ गेलो तरी पठ्ठे आपली जागा धरून, मग जरावेळ त्यांना निरखत जणू त्यांच्यातलाच झालो, अगदी, आय वाज मिसिंग नो बडी !
जनरली अ पिक्चर इज वर्थ थाउसंड वर्डस, पण कधी कधी नेमक्या शब्दांतूनही खूप सांगता येतं , आजच्या बदकाचं , आजोबांचं किंवा या क्रेन्सचं फ़क़्त चित्र टाकून यातलं कितीसं मी (मलाच) सांगू शकलो असतो ?
परवा एका पिशवीवर एक छान ओळ वाचली होती
Las palabras tienen vida. Memoria. Al escucharlas uno se remite al pasado.
शब्दांचं स्वतःचं आयुष्य आहे, आठवणी आहेत, (म्हणूनच) ऎकलेला एखादा शब्द तुम्हाला (नेमका, जणू) त्या काळात घेऊन जातो.
खरंय !
गुड मॉर्निंग !
-निखिल एनिवे, इतर वेळचे सॅंड क्रेन पक्षी