४. जॉली - ३

आतापर्यंत …
जॉली - १
जॉली - २

पुढचे तीन चार दिवस मग मी न चुकता जॉली काढून निघायचो, पण छत्री घेतली की पाऊस पडत नाही, हि काही एकदाही भेटली नाही. मलाही काम वाढले होते त्यामूळे जास्त काही वाटले नाही.

फ़्रायडे अगेन्‌ …
सकाळचे नऊ, टॉवर वन्‌ लिफ़्ट नंबर चार,

‘hey hi …’
‘nikkil ..jolly?’
‘ya here .. see’ छत्री पाऊस योग हा.
‘yaaa … see mine .. already fading ..’
‘ya …another 5-6 days it will be gone ..i guess ..den i need not ..put spot on me '
‘Ya …’
‘So Another date tonight ?’
‘No that stupid pig is going to watch race.. the whole weekend’

सिंगापुरमध्ये Formula One Night race होणार होती शुक्रवार, शनिवार आणि रविवार ..तीनही दिवस.
मी इथे येण्याआधी तिकीटे संपली होती.

‘Nikkil? meet me lunch @ 1.30?’
‘Of course, Call 15 mins early’
‘Ok ok Sure..’ 16 th floor ला बाहेर पडत ती म्हणाली.

‘Lunch ? I am starving…’
‘Wait its just 1 ..u r always starving..’
‘no u should eat too ..its too late lah..’
‘ok coming ..’

‘So u too watching race tonight ?’
‘No never got tickets ..all sold ..’
‘Good …’ ‘oops I mean ..u want to take a walk ?’
‘Where ?’
‘ECP?’
‘With you?’
‘No …you alone mostly ..cuz I will turn into a ghost at the strike of ..7 ..’
आता ‘Oops ' म्हणायची माझी वेळ होती …पोरगी हुशार आहे !
‘Ya sure what time ? but .. I am getting free at 5 itself today ..’
‘530 ok by u?’
‘quite’…

नव्या दोस्तीतले म्हणा की नात्यातले पहिले काही दिवस कित्ती फ़्रेश असतात,
म्हणजे १०० एक रोज भेटणा-या सुंदरश्या चिनी पोरींची मी १ Joyce आणि ९९ non-Joyce अशी विभागणी केलीये, आणि एक लक्षात आलेय माझ्या …सगळ्य़ा चिनी पोरी सारख्या नाही दिसत.. .

ECP,
East Coast Park.

समुद्र खरचं end-less असतो,
मी पहिल्यांदा गणपतीपुळयाला पाहीला होता ..वेड लागले होते त्यादिवशी, ते अजूनही कायम आहे.
मझ्यामते समुद्र आणि पाऊस या जगातल्या पहिल्या दोन सुंदर गोष्टी आहेत. तिसरी म्हणजे interesting company.

म्हणजे दोन गोष्टी …. समुद्र आणि joyce तर होती ठिक आहे पावसा माफ तुला.

सायकली भाड्याने घेऊन आम्ही फिशींग डेक कडे निघालो,
Universal Truth,
पोरींचे ड्रायव्हींग वाईट असते.

हे फिशींग डेक म्हणजे समुद्रात आतपर्यंत गेलेले एक extention आहे. शेवट्पर्यंत गेलो कि मोठया मोठया बोटी फ़ारच जवळ वाटतात अजस्त्र अगदी.

अगदी ठरवून नव्हतो गेलो त्यामूळे कॅमेरा नव्हता मग मोबाईलनेच काही फोटो काढले.

एखादं माणूस कित्ती “लाईव्ह” अस्सू शकते?

तिथल्या लोकांकडून गळ आणि एकाची माशांनी भरलेली बास्केट घेऊन समोर ऊभी ..

‘ok take it fast …they want their fish ..’

‘ok ok show show …ya good picture ..i caught so many fish ..will make sushi now.. '

मग आम्ही ब-याच गप्पा मारल्या.

‘So joyce this boyfriend of urs ..does he love u? i mean whats the deal here?’
‘Nopes No love ..yet… just being around …’
‘The Malaysia one ?’
‘He also dont i guess …’
‘Then how ?’
‘I enjoy their company ..it gets bored otherwise in the new city ..dont u..?’
‘Its just being indian …I am not used to this kind of attitude …in there if a couple is together ..they are
together .. for ..ever .. i mean its a different setup ..there’
‘Ya i can think …from what u said the other day ..’
आणि मग थोडे serious होतं ..ती..
‘I love their comany ..like how i love urs .. so my boyfriend count is one plus ..’
‘Who me !!!!!’ मी
‘Ya dont u like me?’ आणि मिष्कील हसूं …मघाचा seriousचेहरा म्हणजे नाटक होतं तरं
‘Of course .. i do ..’ अशा वेळी काय बोलयचं मला कळत नाही …
‘Hey dont be so serious .. feeling hungry ?’
‘Nopes .. '
‘But I do ..’ आपल्या सपाट पोटावर हात ठेवून ..आणि ते अजूनच आत खेचून ती म्हणाली
‘of course u do …’

आपल्याकडे चौपाटी आहे नं …तशी नाही पण एका सेपरेट एरीयात बरीचशी खाण्याची दुकाने आहेत, समुद्रापासून बरीच आत.

‘you wont get any veg here .. '
‘I will have coconut, some hot ..milo its cold here ..strange Singapore, is never cold ..’
‘Yuhhh what is this ?’
‘Chua chi fill’
फ़ारचं डेंजर होते ते, लाल लाल नूडल्स आणि लाल लाल कुठलेतरी meat. आणि ऑफ कोर्स सूप, पण तेही लाल.
बकासूर आहे नुसती…

‘Aaah so hot .. gimme some of ur milo .. ' हा हू करत ती म्हणाली..
‘no, I cant have it then ..u r eating ..non veg ..’
‘Come on ..I just said u r my boyfriend …now what else u want me to do ..to give me that milo ..?’ तोंड भाजलेय …डोळ्यातून पाणी येतेय तरी मस्तीखोरपणा आहे तसाच. ‘ok I will get a new ..one ..u have this ..’
‘Thats like my boyfriend ..’

सिंपल रुल …

संध्याकाळ छान गेली की रात्र वाईट जाते.
ब-याच जर - तर चा विचार करत आपण मग थकून झोपी जातो ..घड्याळ वेड्यासारखे धावून ४ ५ पर्यंत पोचलेले असते.

शनिवार आणि रविवार हे दोन दिवस म्हणजे ४८ तासांचे नसतात ते असातात …दोन तीन फार फार ऊशीरा उठवणा-या झोपांचे

आणि

काहीबाही विचार करत लागणा-या आणिक छोटया झोपांचे.

(क्रमश:)

-निखिल.

comments powered by Disqus

Related