५. जॉली - ४
आतापर्यंत …
जॉली - १
जॉली - २
जॉली - ३
जॉ
ली रंगवून जायची मलाही सवय झाली होती. पण तीन एक दिवसांत माझी जॉली पार्टनर काही भेटली नाही.
नाही म्हणायला काही एसेमेस आले,
‘working?’
' why so busy la?'
‘mind a bite ?’
पण मीही कामात होतो त्यामुळॆ तासाभरनंतर कधी तरी रिप्लाय करायचो ..तोवर हिचे आटपलेले असायचे.
एकदा संध्याकाळी MRT मध्ये दिसली खरी ..वेडी लांबूनच हाताने खूण करून " जॉली ?” असं विचारत होती मी हात दाखवल्यावर ..जॉली बघून उगीच खोटं नाराज झाली, मग हसली.
मग अशाच कुठल्यातरी week-day ला लंच मध्ये …आरे आज ही इतकी लेट कशी? दोन वाजेपर्यंत कंट्रोल कसे केले बकासूरीने आज….
मी आपण भॉ करतो ना त्या जोशात….
‘Joyce …Jolly …?’
‘Hey !!! Hi, Gone already ….’
तिचा तो नितळ हात मला अगदीच पोरका वाटला.
‘Ohh ..good for u..’ मी …
‘Ya ..but it was nice playing jolly with u…. If i get that dot once again ..den we can play again .. '
‘Ya we can ..’
‘Ok ..i am in a hurry nikkil ..i’ll see u when i’ll see u ..ok bbye ..’
बरेचसे जेवण तसेच ठेवून …ती निघाली काय झालेय हिला ..डायटींग चे भूत शिरले की काय?
आरे मोबाईल इथेच ठेवून गेलीये ..येईल परत…बरचं आहे…याला …Harmless असुरी आनंद म्हणतात..
आली …कित्ती घाई …
“hey …Hi” …मी मोबाईल देत म्हणालो
“hi…came for this and also forgot to tell you I got a job in Malaysia, Joining next week So many Formalities to cover ..thats why late lunch…will call you about that? In a real hurry nikkil…”
“ya anytime …Sure Bye…Congrats …”
“Thank you thank you.. I go now …”
खूप दिवस जवळ असलेली, लळा लागलेली एखादी गोष्ट हरवली आहे का तुमची? एखादा आवडता शर्ट, आवडता कुणीतरी दिलेला पेन?
सवय झालेली कुठलीही वस्तू …व्यक्ती ..?
सुट्टीनंतर आज्जीच्या घरून जाताना एसटीत बसल्यावर आलेले रडू ….
किंवा
एखादा team mate, cubicle सोडून गेल्यानंतरचा next working day …
किंवा घर बदलताना जुन्या घराचे ते केविलवाणे बघणे …तुमच्याकडे ..
Joyce जाणार ऎकून मला …असेच …
त्या क्षणात चेह-यावरही आले असावे बहूतेक. ..
शुक्रवार ….
सकाळी इतके दिवस जॉली काढायची आठवण रहावी म्हणून आरशासमोर ठेवलेले पेन उचलून जागेवर ठेवले…
जाणारे माणूस …जितके आवडते अस्सेल तितके ते जाताना त्याला भेटणे नकोसे होते. खरं तर Joyce माझी कोण होती माझं तिचं काही नातं नव्हतं किंवा तसं ते निर्माण होण्याचा स्कोपही नव्हता, पण काही माणसं आवडून जातात हे खरं, मनाच्या ओढीला नात्याचे किंवा अगदी मैत्रिचेही कोंदन चढवायलाच हवं का ?
कसा तरी आजचा दिवस जाउदेत …बिझी आहोत संगावे का? फक्त फोनवरच होऊन जाईल ..असं बघावं क? कोणी निघून जाताना मला हे असे होते, अगदी इररॅशनल …मुग्धा (सु-याची बायको, MBBS) मला काय ते Seperation Anxiety आहे अशी म्हणते ..खरं असावं ते.
कॉल:
‘Nikkil ..i am outside .. near lift ur floor ..come no?’
जॉईस !!
‘He hi, how are u ?
‘My phone was off ..in meeting..I thought u would have called ..right?’
‘aaah ..i mean ..’
‘So anyways …Leaving tomorrow morning ..lots of packing to do ..have to return phone too ..in contract .. '
‘ohh, good ..’
‘Thanks ..for everything, I will never focus on small imperfections …now..’
‘Thats good .. Joyce’
…..
…
.
असा सायलन्स तूम्ही कसा भरून काढता हो?
काय बोलू?
की
’जॉईस तू जावसं मला बिलकूल वाटत नाहीये. मला तुझी सवय झालीये. तू खुपचं छान आहेस. आणि मी एक नंबरचा मूर्ख आहे, रोज जॉली मूद्दाम विसरून तूला ट्रीट द्यायला हवी होती.”
अत्ता विचार करताना वाटतयं, अस्सं च्या अस्सं बोलून टाकायला हवं होते. तिला कुठे कळायला? मला तरी बरं वाटलं असतं ना तिला तिचे “फ़ेअर शेअर ऑफ़ क्रेडीट” देऊन.
“चाओ देन बाय ..बाय”
“बाय जॉईस"
मुलींना हग करताना कायमच अवघडल्यासारखं होते …
आताही, कित्ती नाजूक ही ..निख्या हळूं लेका, मोडेल ती ….वगैरे …..हात कित्ती मऊ ….हे सगळं डोक्यात….
तिने लिफ़्ट्चे बटन दाबले …
’टिंग ….’
सहा वाजलेत ..चला ….
खाली आलॊ …
आजही ब-याच बायका ..होत्या ..
पण जाऊदेत … जॉईस चे रेकॉर्ड तुटायला नको …मी नाही मोजल्या.
स्टेशन कडे निघालो…
हलकं वाटणं दोन प्रकारचं असतं …
या दुस-या प्रकाराला …मोकळं की भकास वाटणंही म्हणतात.
‘Nikkil jolly?’
!!!!
मागे वळून पाहिलं तरं
जॉईस !!! उभी, हात दाखवत.
हातावर एक मोठासा ठिपका …आणि तो ठिपका काढायला वापरलेले पेन टक्क करून ..माझ्यासमोरच आत ठेवले. आणि हसली …
मीही हसलो …
‘ya Joyce ….u caught me ..’
‘..Hey ..So I do Get this jolly treat right … ?’ ती जवळ येत म्हणाली.
’ Of course you do ..’
घरी परतणा-या त्या गर्दीतून मग ..
एक बाहूली
आणि
“हिला आज खुप चारुयात ..जास्त वेळ गप्पा मारायला होईल .. " असा सुखावलेला मी .. सब वे कडे निघालो होतो.
(कथा समाप्त)
-निखिल.